सोलापुरातील कोरोना प्रश्नी खा. शरद पवारांना केली विनंती

सोलापुरातील कोरोना प्रश्नी खा. शरद पवारांना केली विनंती
Updated on

मोहोळ (सोलापूर): सोलापुरात वाढता कोरोनाचा कहर पाहता परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यासाठी आता विशेष उपाययोजना करण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना पत्र पाठवून विनंती केली आहे. 

सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्युदर लक्षात घेता तो रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी शासन स्तरावरून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे. 

यासंबंधी खासदार शरद पवार यांनी दोन दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. 
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून 25 मेअखेर एकूण रुग्णसंख्या 608 झाली आहे. तर मयत 58 रुग्ण आहेत. तसेच रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले 277 रुग्ण असले तरी इतरांच्या तुलनेत मृत्युदर जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. 
याच पार्श्‍वभूमीवर माजी आमदार राजन पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे खासदार शरद पवार यांच्याकडे या प्रश्‍नांची कैफियत व्यक्त केली आहे. विशेषतः सोलापूर शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यामध्ये अपयश येत असल्याचे दिसत आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या जिल्ह्याच्या दृष्टीने धोकादायक असून यासाठी तत्काळ उपाययोजना आखून कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात कडक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे, अशी मागणी माजी आमदार राजन पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे. 

कडक बंधने घालावीत
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत कडक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. लॉकडाउनच्या काळातही पुणे, मुंबई अथवा इतर मोठ्या शहरांतून लोक ग्रामीण भागात येताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळून येऊ लागलेले आहेत. तरी आपण जिल्हा सीमाबंदी, तालुका सीमाबंदी अत्यंत कडक करण्यास प्रशासनास आदेश द्यावेत. जेणेकरून ग्रामीण भागात होणारा कोरोनाचा प्रसार रोखता येईल, यावर खासदार शरद पवार यांनी दोन दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्‍वासन दिले आहे. 
- राजन पाटील, माजी आमदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dr. Valsangkar’s suicide case
solapur cp office
solapur univercity
34th Water Struggle Council for 13 drought-prone talukas in Mangalwedha
Marathi News Esakal
www.esakal.com