
सोलापूर : नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारतात एक हजार मुलांमागे ९१८ मुली, असा जन्मदर होता. पण, सध्या एक हजार मुलांमागे १०२५ मुली असून त्यामागे पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी आहे. महिला राजकारणात याव्यात, त्यातूनच जिजाऊ तयार होऊन छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेतील. कम्युनिस्टांनी महिलांना राजकारणात बदनाम केले. पण, पंतप्रधानांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. आता लोकसभा व विधानसभेतही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल, असे भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी स्पष्ट केले. देशातील खासदारांची संख्या आठशेहून अधिक होईल, आमदारही वाढतील, असेही ते म्हणाले.