
मंगळवेढा : उपसा सिंचन योजना सौर प्रकल्पावर चालवाव्या, टेंभूचे पाणी मंगळवेढ्यापर्यंत द्यावे, आणि वडापूर बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजमध्ये करावे यासह 20 मागण्यांचा ठराव शेटफळे ता. आटपाडी येथे झालेल्या 33 व्या पाणी परिषदेत मांडण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा शिवाजीराव काळुंगे तर निमंत्रक वैभव नाईकवडी होते.तत्पूर्वी क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि स्व.गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.