सोलापुरात माझी वसुंधरा सायकल राईडला प्रतिसाद 

cycle ride.jpg
cycle ride.jpg

सोलापूर : राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व पर्यावरण विभागाने जाहीर केलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण विभाग, सोलापूर महापालिका व सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने आज "माझी वसुंधरा सायकल राईड' काढण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या प्रबोधनासाठी आज सोलापुरात सायकलप्रेमी एकत्रित येत सायकलस्वारी केली. 

सोलापूरमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. सात रस्ता-आसरा चौक-रंगभवन या मार्गावर सायकलिंग करून सोलापूरकरांचे प्रबोधन केले. सायकलिंगमुळे इंधन बचत तर होतेच. पण त्यामुळे हानिकारक वायू वातावरणात पसरत नसल्याने प्रदूषणदेखील कमी होते. यामुळे वातावरणमध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. यामुळे येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा मिळू शकेल, असे मत सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. सारंग तारे यांनी मांडले. उपायुक्त धनराज पांडे म्हणाले, महापालिकेतर्फे लोकसहभागातून विविध उपक्रम सुरु आहेत. महापालिकेला जास्तीत जास्त झाडे देऊन सोलापूरकरांनी सहकार्य करावे. कचरा व्यवस्थापन काळाची गरज आहे. उपस्थितांना यावेळी स्वच्छतेची शपथ देण्यात आली. 
सर्व सायकलस्वारांसाठी चहापानाची व्यवस्था लायन्स क्‍लब सोलापूरतर्फे करण्यात आली होती. आभार फाऊंडेशनचे सचिव भाऊराव भोसले यांनी मानले. यावेळी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर, सहायक आयुक्त श्री. विक्रमसिंह पाटील, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार व मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी नितीन चपळगावकर, रजनीकांत जाधव, चेतनकुमार लिगाडे, अभिषेक दुलंगे, गणेश शिलेदार, फाउंडेशनच्या महिला समन्वयक श्रद्धा सक्करगी यांनी परिश्रम घेतले.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com