सोलापूर जिल्ह्यातील निर्बंध उठणार! सहा तालुक्‍यातून कोरोना हद्दपार

बार्शी, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत. आता हा कोरोना परतीच्या वाटेवर असून अक्‍कलकोट, माढा, पंढरपूर या तालुक्‍यात प्रत्येकी एक तर सांगोल्यात दोन आणि मोहोळ तालुक्‍यात सर्वाधिक तीन सक्रिय रुग्ण आहेत.
शहरातील निर्बंध
शहरातील निर्बंधESAKAL
Updated on

सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे आटोक्‍यात आली असून शहर-ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे अवघे दहा सक्रिय रुग्ण आहेत. बार्शी, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत.

शहरातील निर्बंध
उन्हाळी सुटीत दररोज दोन तासांची शाळा! मुलांना लेखन-वाचनाचे धडे

कोरोनाच्या दोन्ही लाटेत प्रशासनाची चिंता वाढविलेला कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे. कडक लॉकडाउन आणि पुन्हा कडक निर्बंध लागू केल्यानंतर कोविशिल्ड व कोवॅक्‍सिन या प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाला वेळीच रोखण्यात यश मिळाले. राज्यातील जवळपास आठ कोटी व्यक्‍तींनी प्रतिबंधित लस टोचली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील 30 लाख व्यक्‍तींचा समावेश आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये माळशिरस, बार्शी, पंढरपूर या तीन तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यानंतर सर्वच तालुक्‍यासह सोलापूर शहराचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक राहिला. प्रतिबंधित क्षेत्र आणि दंडात्मक कारवाईमुळे लोकांनी नियमांचे पालन करायला सुरवात केली. शिक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला. त्याचाही मोठा लाभ कोरोनाला रोखण्यासाठी झाला. आता हा कोरोना परतीच्या वाटेवर असून अक्‍कलकोट, माढा, पंढरपूर या तालुक्‍यात प्रत्येकी एक तर सांगोल्यात दोन आणि मोहोळ तालुक्‍यात सर्वाधिक तीन सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील निर्बंध
'ग्लोबल टीचर'वर होणार शिस्तभंगाची कारवाई! शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला सीईओंकडे अहवाल

चौथी लाट नाहीच, तरीही नियम पाळा
जगातील काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. आपल्याकडे कोरोनाची चौथी लाट येईल, अशी भीती आहे. पण, तुर्तास तशी कोणतीही शक्‍यता नाही. तरीही, नागरिकांनी आणखी काही दिवस मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागेल. दुसरीकडे 12 वर्षांवरील सर्वांनीच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

शहरातील निर्बंध
ठिबकसाठी आता 80 टक्‍के सबसिडी! 13 दिवसांत मिळणार अनुदान

शहरातील कोरोनाची स्थिती
एकूण बाधित
33,662
कोरोनामुळे मृत्यू
1505
कोरोनामुक्‍त रुग्ण
32,155
सक्रिय रुग्ण
2
----------
ग्रामीणमधील कोरोनाची स्थिती
एकूण बाधित
1,86,036
कोरोनामुळे मृत्यू
3,726
कोरोनामुक्‍त रुग्ण
1,82,302
सक्रिय रुग्ण
8

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com