उन्हाळी सुटीत दररोज दोन तासांची शाळा! मुलांना लेखन-वाचनाचे धडे

शाळा बंद राहिल्याने त्यांना शिक्षण घेता आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर आता उन्हाळा सुटीत दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज किमान दोन ते तीन तास लेखन व वाचनाचे धडे दिले जाणार आहेत.
शाळा
शाळाEsakal

सोलापूर : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शाळा बंद राहिल्याने त्यांना शिक्षण घेता आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर आता उन्हाळा सुटीत दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज किमान दोन ते तीन तास लेखन व वाचनाचे धडे दिले जाणार आहेत.

शाळा
'एसपी' तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन! हातभट्टी दारुचे गाव बनले उद्योगगाव

9 मार्च 2020 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग पूर्णपणे बंद राहिले. तिसरी लाट ओसरल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून पहिलीपासूनच्या सर्वच शाळा उघडण्याचा निर्णय झाला. लाखो विद्यार्थी अजूनही शाळांमध्ये येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, कोरोना काळात बहुतेक दिवस शाळा बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणावर बालविवाह लावून देण्यात आले आहेत. तर अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले असून ते आता बालमजूर म्हणून इतरत्र काम करू लागल्याचेही चित्र आहे. कोरोनामुळे विस्कटलेली प्राथमिक शिक्षणाची घडी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सुटीतही शाळा भरवाव्यात, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्‍त केली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्हा परिषदांना त्यादृष्टीने निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. राज्यातील जळगाव, नगर, नाशिक या जिल्ह्यांनी दुसरी ते सातवीपर्यंतच्या शाळा (वर्ग) उन्हाळी सुटीत किमान दोन-तीन तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सोलापूर जिल्हा परिषदेनेही निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी मेपासून केली जाणार आहे.

शाळा
31 मार्चपूर्वी घ्या जुन्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र! एप्रिलपासून दुप्पट शुल्क

उन्हाळा सुटीत विद्यार्थ्यांना किमान दोन तास लेखन व वाचनाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासंबंधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा झाली आहे. आता मार्चनंतर शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

शाळा
ठिबकसाठी आता 80 टक्‍के सबसिडी! 13 दिवसांत मिळणार अनुदान

सव्वा कोटी विद्यार्थ्यांना होईल लाभ
राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांची संख्या 99 हजार तीन इतकी आहे. त्याअंतर्गत जवळपास 79 लाख विद्यार्थी शिकत आहेत. दुसरीकडे, पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये 32 लाखांपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. पण, हातावरील पोट असलेल्या पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाइल नसल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही. दुसरीकडे, बहुतेक पालकांनी ऑनलाइन शिक्षणाचा विपरीत परिणाम जाणवू लागल्याने मुलांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले होते. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आता उन्हाळा सुटीत दररोज दोन तासांची शाळा भरविली जाणार आहे.

शाळा
आजीच्या देखभालीसाठी आली अन्‌ तरुणासोबत पळाली! 16 व्या वर्षी दिला मुलाला जन्म

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com