esakal | शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी निबंध स्पर्धेचे निकाल घोषित | Educational News
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी निबंध स्पर्धेचे निकाल घोषित

जिल्ह्यामध्ये राबविलेल्या शिक्षक व पर्यवेक्षीय अधिकारी यांच्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे निकाल गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी घोषित केले.

शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी निबंध स्पर्धेचे निकाल घोषित

sakal_logo
By
अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swamy) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये राबविलेल्या शिक्षक व पर्यवेक्षीय अधिकारी यांच्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे निकाल गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख (Dhanajay Deshmukh) यांनी घोषित केले. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख गटातून अनुक्रमे डॉ. प्रेमनाथ रामदासी, प्रिया तोरणे, प्रशांत सरुडकर यांचे निबंध लेखन सर्वोत्कृष्ट ठरले.

कोरोना काळानंतर शिक्षण तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांची मते, योजना, संकल्पना, उपक्रम आणि संभाव्य भूमिका निबंध लेखनाच्या माध्यमातून मांडण्याचे आवाहन केले गेले होते. तालुकास्तरावरील तीनही गटातील पहिले तीन क्रमांक जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले आहेत. यशस्वी शिक्षक आणि अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते, प्रदीप करडे यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा: भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली अप्रेंटिसशिप पदांची भरती!

'सकाळ'मध्ये बोधकथा मालिकेचे लेखक असणारे प्रशांत सरुडकर यांची इतिहासाचे अभ्यासक म्हणून प्रसिद्धी आहे. बालभारतीच्या इतिहास समिती वरती गेल्या आठ वर्षापासून संपादन सदस्य असणाऱ्या सरुडकर यांनी बालभारती इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकाचे लेखनही आहे. त्यांची ऐतिहासिक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

डॉ. प्रेमनाथ रामदासी हे व्यासंगी शिक्षक आहेत. जागतिकीकरण व मराठी कविता या विषयावरील संशोधनासाठी सोलापूर विद्यापीठाने त्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित असून त्यांनी "आसूड' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. ते उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात.

हेही वाचा: 'औषधनिर्माणशास्त्र डिप्लोमा व डिग्री प्रवेशाची तारीख एकच असावी'

स्पर्धेचा निकाल...

  • प्राथमिक शिक्षक गट : प्रथम - डॉ. प्रेमनाथ रघुनाथ रामदासी, शाळा शेरी नंबर एक, वेळापूर, द्वितीय : मंगल पोपट गायकवाड, तृतीय : स्वाती शंकरराव पायमल, मारकडवाडी, आनंदी गजानन काळे शाळा, कारंडेवस्ती तांदूळवाडी.

  • मुख्याध्यापक गट : प्रथम - प्रिया सखाराम तोरणे, शाळा वाघडोह वस्ती, कोळेगाव, द्वितीय : शहजादी सादिक काझी, शाळा रणजितनगर, अकलूज, तृतीय : तुकाराम ज्ञानदेव वाघमोडे.

  • केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी गट : प्रथम : प्रशांत शिवाजीराव सरुडकर, केंद्र नातेपुते, द्वितीय : अशोक रूपनवर, केंद्र कळंबोली, तृतीय : नितीन अशोक साने, केंद्र नेवरे.

loading image
go to top