फोन एसएमएस ऑनलाईन द्वारे कळणार निकाल

फोन एसएमएस ऑनलाईन द्वारे कळणार निकाल
Updated on

सोलापूर  : राज्यात लॉक डाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय बंद आहेत. शासनाने पहिली ते आठवी व नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापनानुसार पुढील इयत्तेत प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांना दूरध्वनी, एसएमएस किंवा इतर ऑनलाईन पद्धतीद्वारे देण्याच्या सूचना शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे राज्यातील शाळा व महाविद्यालयांना मार्च च्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तोच निर्णय घेण्यात आला आहे.

एक मे या महाराष्ट्र दिनी सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जात असतात. मात्र अद्यापही राज्यातील कोणत्याही शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिक्षण संचालक पाटील यांनी एक पत्र काढून पहिली ते आठवी व नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार मूल्यमापन करून त्यांचे निकाल दूरध्वनी, एसएमएस किंवा इतर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये निकालावरून संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संचालकांनी दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मिळाल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षाचा त्यांना अभ्यास करणे सोयीचे जाणार आहे. त्याचबरोबर पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांना निकालपत्र पोच करण्याची व्यवस्था करावी असेही शिक्षण संचालकांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

excise action solapur
ujani dam, solapur
Paricharak, Raut or Chavan? BJP Yet to Reveal Its Solapur MLC Candidate
A Home Turned Silent: Mass Murder Leaves Entire Family Grieving Irreparable Loss
Marathi News Esakal
www.esakal.com