
सोलापूर : वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उपसा, वापर व वाहतूक रोखण्यासाठी अशा व्यक्तींवर जबर कारवाई केली जाणार आहे. वाळू व इतर गौण खनिजाची अवैध/अनधिकृत उपसा, वापर, वाहतूक व तस्करीमध्ये आढळून आलेल्या व्यक्ती यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदीनुसार केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई म्हणजेच एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही महसूल विभागाच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच करावी, अशा सूचना महसूल मंत्रालयाने दिल्या आहेत.