asaduddin owaisi | ओवैसींच्या गाडीवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला बक्षीस, वाचा काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Asaduddin Owaisi

ओवैसींच्या गाडीवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला बक्षीस, वाचा काय घडलं?

एमआयमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोलापूर दौरा केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर जोरदार टीका केली. जमावबंदी असतानाही त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. मात्र, ओवैसींचा दौरा चर्चेत आला ते म्हणजे त्यांच्या गाडीवर केलेल्या कारवाईमुळे! गाडीवर नंबर प्लेट नसल्याने सोलापूरच्या वाहतूक विभागाने ओवैसींकडून दंड वसूल केला. ही कारवाई करणाऱ्या पोलिसांना आयुक्तांकडू बक्षीस मिळालं आहे.

नक्की काय घडलं?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सोलापुरात खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या उपस्थितीत एमआयएमचा (MIM) मेळावा पार पडला.य सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात हा कार्यक्रम भरवण्यात आला. त्यासाठी खासदार ओवैसी हैदराबादहून सोलापुरात आले होते.

सर्वप्रथम शासकीय विश्रामगृहात ते दाखल झाले. यावेळी त्यांच्या गाडीला समोरील बाजूस नंबरप्लेट नव्हती. त्या ठिकाणी उपस्थित वाहतूक पोलिसांनी त्यांच्या गाडीला 200 रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर चालकाने तत्काळ नंबरप्लेट (टीएस 11, ईव्ही 9922) लावून घेतली.

आयुक्तांनी जाहीर केलं बक्षीस!

पोलीस निरीक्षक वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक चिंतांकिदी आणि हवालदार शीरसाठ यांनी निपक्षपातीपणे ही कामगिरी केली. त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी चिंताकिंदी यांना रोख 5 हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करून त्यांचा गौरव केला.

loading image
go to top