A proud farmer with his ridge gourd harvest, cultivated using organic methods to reduce costs and achieve debt freedom.sakal
सोलापूर
farmer Success Story :'दोडक्याने दाखवली कर्जमुक्तीची वाट'; जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पादन खर्चात झाली बचत
Natural ridge gourd cultivation brings success and savings to farmer : शेतीत त्यांनी पर्यावरणाला व आरोग्याला उपयुक्त म्हणून त्यांनी जैविक शेती करण्याचा निर्णय घेतला. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या द्राक्षबागेचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्यावर २८ लाखांचे कर्ज झाले होते.
रोपळे बुद्रूक : अनवली (ता. पंढरपूर) येथील स्वप्नील भारत आसबे या अभियंता झालेल्या तरुणाने नोकरीची अपेक्षा न करता, थेट शेतीचा रस्ता धरला. जैविक शेतीच्या माध्यमातून त्यांनी दर्जेदार दोडक्याचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे दोडक्याच्या उत्पन्नातून स्वप्नीलची कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.