
सोलापूर जिल्ह्यात दररोज पाच लाख लिटर पेट्रोलची विक्री
सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यातील ३७० पेट्रोल पंपावर इंधनाची विक्री केली जाते. इंधनाचे दर वाढले असले तरी दिवसाला जिल्ह्यात ५ लाख लिटर पेट्रोलची विक्री होत आहे. विशेष म्हणजे सीएनजीवरील वाहनांची संख्या वाढत असली तरी पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर परिणाम झाला नसल्याचे भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले. शहर जिल्ह्यात मिळून दररोज पाच लाख लिटर पेट्रोलची व दहा लाख लिटर डिझेलची विक्री होत आहे. तसेच एकवीस हजार किलो सीएनजीची विक्री होत आहे. सीएनजीवर धावणाऱ्या गाड्या बाजारात येत आहेत. तसेच त्याचा दरही पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत कमी आहे.
मात्र तरीही पेट्रोल विक्रीवर याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्याचबरोबर मागील महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने याचा थेट परिणाम विक्रीवर होत असून, विक्रीमध्ये दहा टक्के परिणाम झाला असून, पंपचालकांना आपले भांडवल वाढवावे लागत असल्याचेही यावेळी विक्रेत्यांनी सांगितले. त्याबरोबर पंपचालकांच्या कमिशनवर याचा कोणताही परिणाम होत नसून, भांडवलामध्ये वाढ करावे लागत असल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले. इंधनाचे दर वाढत असल्याने वाहनधारक वाहनांवर नियंत्रण ठेवत आहेत. त्यामुळे विक्री कमी होत आहे. आगामी काळात इंधनाचे दर वाढले तर याचा विक्रीमध्ये मोठा परिणाम दिसून येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीएनजीची वाहने वाढणार
शहर जिल्ह्यात रिक्षांची संख्या १५ हजार ८५४ इतकी आहे. त्याचबरोबर चारचाकी वाहनांची संख्या आठ लाख आहे. यातील बहुतांश रिक्षांमध्ये सीएनजी किट बसविण्यात आले आहे तर बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या चारचाकी गाड्यांमधील सीएनजी किट बसविण्यात येत असल्याने आगामी काळात याची संख्या वाढणार असल्याचे यावेळी सांगिण्यात आले.
मागील पंधरा दिवसांपासून सीएनजी वाहनांसाठी सीएनजीचा तुटवडा जाणावत आहे. पुण्यावरुन सीएनजी टॅंकर लवकर उपलब्ध होत नसल्याने वाहनधारकांना सीएनजीची वाट पहावी लागत आहे.
- प्रवीण कुलकर्णी, सीएनजी पपंचालक, कुंभारी, सोलापूर
पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने याचा विक्रीवर परिणाम झाला आहे. वाहनधारक काटकसर करीत असल्याने मागील महिनाभरात विक्री दहा टक्के कमी झाली आहे. आगामी काळात दर वाढत गेले तर आणखीन यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- महेंद्र लोकरे, सचिव, पेट्रोल पंप असोसिएशन, सोलापूर
इंधनाचे दर
इंधन दर (लि) दररोज विक्री
पेट्रोल १२० रुपये ५ लाख लिटर
डिझेल १०३ रुपये १० लाख लिटर
सीएनजी ८४ रुपये (किलो) ५ हजार किलो
Web Title: Rising Demand For Petrol Diesel Five Lakh Liters Of Petrol Sold Daily In Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..