
मळेगाव: बार्शी तालुक्यातील हिंगणी मध्यम प्रकल्प व ढाळे-पिंपळगाव प्रकल्प परिसरात पुन्हा एकदा पावसाने दमदार बॅटिंग केल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरून ओसंडून पाणी वाहत आहे. परिणामी भोगावती व नीलकंठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. पिंपरी येथील भोगावतीवरील पूल आठवड्यात चार वेळा पाण्याखाली गेला असून, त्यातूनच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.