Bus Accident : विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात; दोन ठार ८ गंभीर

Bus Accident
Bus AccidentEsakal

विठूरायाच्या दर्शानासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

उमदीहून मंगळवेढामार्गे पंढरपूरकडे जाताना येद्राव फाटा येथे हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी प्रवाशांना सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी हे मध्य प्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भारत यात्रेसाठी मध्यप्रदेश येथील भाविकांची खाजगी ट्रॅव्हल बस कर्नाटक येथे देवदर्शन करून पंढरपूरकडे निघाली होती. ट्रॅव्हल बस अतिवेगात होती त्याचबरोबर ड्रायव्हर फोनवर बोलत असल्याचेही जखमी भाविकांनी सांगितलं आहे. ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे बसचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांना घटनास्थळी भेट देत भाविकांना बाहेर काढलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com