theft
sakal
मोहोळ - शेतात राहणाऱ्या पती-पत्नीस चाकू व कोयत्याने मारहाण करून, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, घरातील सोन्या, चांदीचे दागिने, मोबाईल असा एकुण दोन लाख 61 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने दरोडा टाकून चोरून नेल्याची घटना, गलंदवाडी, ता. मोहोळ येथे मंगळवार ता. 9 रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान चोरटे जाताना बाहेरून कडी लावून गेले. या झटापटीत तानाजी थिटे व त्यांच्या पत्नी सिंधू थिटे हे जखमी झाले आहेत.