सोलापूर : मंगळवेढ्यात दरोडा; चार लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery in mangalveda
सोलापूर : मंगळवेढ्यात दरोडा; चार लाखांचा ऐवज लंपास

सोलापूर : मंगळवेढ्यात दरोडा; चार लाखांचा ऐवज लंपास

मंगळवेढा (सोलापूर) : शहरालगतच्या एका बंगल्याचे कुलप तोडून गुरुवारी उत्तररात्री तीन वाजता दरोडेखोरांनी प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत कुटुंबातील नववधूच्या अंगावरील दागिने अक्षरश: ओरबडून नेले. नववधू व इतर सदस्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा साडेचार लाखाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिमंत जाधव यांनी शुक्रवारी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. (visiting the spot, the investigation has been speeded up and four persons have been arrested)

हेही वाचा: मोहोळ : कोरोना मृतांच्या वारसासाठी तीन दिवशीय मदत शिबीराचे आयोजन

अज्ञात दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिस सूत्राकडून मिळालेली माहितीनुसार धर्मगाव रोडवर मंदाकिनी अंबादास सावजी यांच्या बंगल्यात गुरुवारी (ता. 23) उत्तररात्री साडेतीन वाजता अज्ञात सहा दरोडेखोरांनी कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. मंदाकिनी यांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली. अंगावरील सोने, घरातील पैसे काढून द्या अन्यथा तुम्हाला खल्लास करू असे म्हणत नववधूच्या अंगावरील व मंदाकिनी यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले. या झटापटीत यातील त्यांच्या अंगठ्या जवळच्या बोटाला जखम झाली.(thumb was injured in the scuffle)

हेही वाचा: सोलापुर : कार व मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यु ; तिघे जखमी

चोरटे हे अंदाजे 30 ते 35 वयोगटाचे असल्याचा अंदाज असून त्यांनी अंगात जर्किन, हातात ग्लोज, तसेच लोखंडी सळी, हातात स्टीलचे कडे, डोक्‍याला रुमाल बांधलेल्या अवस्थेत होते. चोरट्यानी महिलांच्या कानातील दागिने निघत नसल्याने दरोडेखोरांनी कात्रीच्या साह्याने कट मारून काढून घेतले. या घटनेत सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व कपाटातील रोख रक्कम असे एकूण साडेचार लाखाचा ऐवज लुटून नेला आहे. दरोडेखोरांनी जाताना कुटुंबीयांना एका खोलीत कोंडून बाहेरून कडी लावून गेले त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधत सुटका करून घेतली. घटनास्थळी श्वानपथक मागवण्यात आले. त्याचा माग घटनास्थळापासून दामाजी कारखाना रस्त्यावरील सूत मिलपर्यंत गेला. याबाबत अज्ञात सहा चोरट्याविरोधात अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे करीत आहेत.

नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दरोडे व अनेक छोट्या मोठ्या चोऱ्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी पडोळकरवाडी येथे एका वयोवृद्ध महिलेचा खून करून दागिने लुटले. त्या दरोड्याचा तपास अद्यापही लागला नसताना शहरात पुन्हा दरोडा पडल्याने दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हान दिल्याने नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

Web Title: Robbery In Mangalveda Of Rs Four Lakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Solapur
go to top