
सोलापूरचे वैभव असलेल्या माळढोक पक्ष्यांची संख्या चार वर्षांत एकवरून पुढे गेलेली नाही. भविष्यात कृत्रिम प्रजननामुळेच माळढोक पक्ष्याची संख्या वाढू शकते. मात्र, तत्पूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात भर पाडणारी घटना म्हणजे स्थलांतर करून येणारे फ्लेमिंगो तथा रोहित पक्षी हे सोलापूरच्या पक्षी पर्यटनास लाभलेले नवे अग्निपंख आहेत. यांची संख्या आणि सौंदर्य पाहता माळढोक पक्षाची उणीव हे पक्षी भरून काढतील. उजनी धरण क्षेत्रातील पर्यटन प्रकल्पासाठी हे पक्ष्यामुळे नवे पंख लाभू शकतात.