esakal | कोरोना : पोलिस पाटील, स्वच्छता शिपाई, तलाठी, ग्रामसेवक लागले कामाला
sakal

बोलून बातमी शोधा

Rural administration Stress on Corona

शहर व तालुक्यामध्ये त्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे व देशाच्या इतर भागाबरोबर परदेशातून नागरिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आले आहेत. राज्यासह देशाने लॉकडाऊन केले असून नागरिकांनी घरात बसून राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री व पंतप्रधान केले असताना ग्रामीण भागात मात्र लोक या आव्हानाला न मानता काही गावात खुलेआम खेळताना दिसल्यामुळे त्यांना घरीच बसण्याच्या सूचना पोलिस पाटील, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर, पाणीपुरवठा व स्वच्छता शिपाई देऊ लागले.

कोरोना : पोलिस पाटील, स्वच्छता शिपाई, तलाठी, ग्रामसेवक लागले कामाला

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन केले. यात ग्रामीण जनतेची गैरसोय होवू नये म्हणून शासन नियुक्त समितीच्या सदस्याकडेच अनेक गावाचा पदभार असल्याने घरा बाहेर आलेल्यासाठी पोलिस पाटील व ग्रामपंचायतीच्या कर्मचारी तणावू लागले. 
शहर व तालुक्यामध्ये त्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे व देशाच्या इतर भागाबरोबर परदेशातून नागरिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आले आहेत. राज्यासह देशाने लॉकडाऊन केले असून नागरिकांनी घरात बसून राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री व पंतप्रधान केले असताना ग्रामीण भागात मात्र लोक या आव्हानाला न मानता काही गावात खुलेआम खेळताना दिसल्यामुळे त्यांना घरीच बसण्याच्या सूचना पोलिस पाटील, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर, पाणीपुरवठा व स्वच्छता शिपाई देऊ लागले. पण काही नागरिक यांच्या सुचनेला न मानता हुज्जत घालू लागले. शहरामध्ये पोलिसांनी दंडात्मक व ठोकाठोकीची कारवाई प्रभावीपणे केली. कोरोना बचाव करण्यासाठी महसूल व आरोग्य खात्याने जी समिती नियुक्त केली आहे. त्या समितीतील सदस्य तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सोसायटी सदस्य, बचत गट सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांनी नियुक्त केलेल्या शासकीय सदस्याकडे एकापेक्षा अधिक गावाचा पदभार असल्यामुळे बहुतांश गावात यांना जाता येत नाही. त्यामुळे त्यांनाही जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे समिती निवड करताना इतर खात्यातले काही प्रमुख कर्मचारी यात निवडणे अपेक्षित होते. परंतु एकाच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी दिल्यामुळे पोलिस पाटील, ग्रामपंचायत, तलाठी, आरोग्य खाते यांच्याकडे परगावहून आलेल्याची आकडेवारीत तफावत होवू लागल्याने या समिती सदस्याचे कागदोपत्री कामकाज करत असल्याचे दिसू लागले. वास्तविक पाहता या सदस्यामध्ये दुसऱ्या खात्यातील कर्मचारी निवड करणे अपेक्षित आहे. सध्या तालुक्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना गावात किती नागरिक आले, कुठून आले, त्यांचा संपर्क क्रमांक, कोणाकडे आले, रोगाच्या संबधित आजार आहे का? याची माहिती सध्या संकलित करण्यात विलंब होत असला तरी ती गोळा केली. या माहितीच्या आधारे संबंधितांनी घरोघरी जाऊन त्यांना प्रबोधन करून घराबाहेर न पडण्याच्या व संचारबंदीचा अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी सूचना देणे अपेक्षित आहे. परंतु ग्रामीण भागात असे होताना दिसत नाहीत. पोलिसांची संख्या तोकडी असल्याने होमगार्डच्या मदतीने ग्रामीण भागात गस्त घालून घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

जनतेनी घाबरू नये

तालुक्यांमध्ये कोरोना रोगाच्या संदर्भात सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संशयीतावर होम क्करंटरवर ठेवण्यात आले. त्यांच्यावर आरोग्य खात्याचे लक्ष आहे. सध्या तालुक्यांमध्ये आरोग्य व महसूल खात्यात रिक्त पदे आहेत. तरीही परिस्थिती नियंत्रणात आहे. जनतेनी घाबरू नये प्रसंगी इतर खात्यातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यकतेनुसार करण्यात येईल.
- उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी

loading image