धावती रेल्वे अन मुसळधार पावसात एका मातेसाठी "तो" ठरला देवदूत

railway.jpg
railway.jpg

सोलापूरः मुंबईहून निघालेली बंगळूरू रेल्वे.....तुफान वेगाची बरोबरी करणारा पावसात...अचानक त्या मातेला सुरू झालेल्या प्रसववेदना....या मातेला कोण मदत करणार? हा प्रश्‍न समोर असताना एका खाकी कपड्यातील देवदुताने मदतीचा हात पुढे केला अन अखेर त्या मातेला रेल्वेतून दवाखान्यापर्यंत पोचवणे शक्‍य झाले, चालत्या रेल्वेत ही घडलेली कहानी माणुसकीच्या मदतीचे उदाहरण बनले. 

मुंबईहून कल्याणमार्गे बेंगळुरूकडे रेल्वे निघाली. त्यावेळी एक गर्भवती महिला तिच्या लहान भावासह रेल्वेत बसली आणि प्रसुतीसाठी माहेरी यादगिरीला निघाली. नववा महिना सुरू होता. माहेर जवळ-जवळ येत असल्याने मिनाक्षीच्या चेहऱ्यावर हास्य होते. दरम्यान, रेल्वे सोलापूर स्थानकावर पोहचली. तिथून गाडी पुढे मार्गस्थ झाली अन्‌ मिनाक्षीच्या पोटात कळा सुरु झाल्या. भेदरलेल्या लहान भावाने प्रसंगावधान साधून गाडीतील रेल्वे पोलिसांना हकीकत सांगितली. त्यावेळी शफिक शेख यांनी कंट्रोलला माहिती देऊन टिकेकरवाडीला गाडी थांबविली. 

परतीच्या पावसाचा जोर वाढला होता. धो-धो पाऊस पडत होता, तस तशा मिनाक्षीच्या पोटातील कळा वाढू लागल्या. टिकेकरवाडीला रेल्वे थांबताच रेल्वे जवान शेख यांनी टोल फ्रि क्रमांकावरून रुग्णवाहिकेसाठी कॉल केला. मात्र, रूग्णवाहिका त्याठिकाणी पोहचण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागणार होती. पण मिनाक्षीच्या वेदना पाहून तेवढा वेळ थांबणे अशक्‍य होते. 

त्यावेळी शफिक शेख यांनी जवळच उभ्या असलेल्या खासगी वाहनचालकास हटकले. त्यानंतर त्यांनी होकार दिला आणि मिनाक्षीला त्या खासगी वाहनात बसविले. त्यानंतर समोरील परिस्थिती पाहून त्या वाहनचालकाने काही मिनिटातच वाहन सोलापुरातील खासगी रुग्णालयात पोहचविले. मिनाक्षीला तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. मिनाक्षीला गाडीतून खाली उतरविले आणि तिच्यावर उपचार सुरु झाले. पुढील दहा मिनिटांतच मिनाक्षीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मिनाक्षीला मुलगा झाला आणि मिनाक्षीची प्रसुती सुखरुप पार पडली. मिनाक्षीसोबत असलेला तिचा भाऊ अमोल चव्हाण याने मदतीला धावून आलेल्या रेल्वे जवान शफिक शेख यांच्यासह चरणसिंग, संजय प्रसाद आणि रामचंद्र यांचे कौतूक करून आभार मानले. 

रेल्वे मंत्रालयाकडूनही कौतूक 
भरधाव वेगात निघालेली मुंबई- बंगळुरु एक्‍स्प्रेस, सायंकाळी साडेसहाची वेळ आणि अवकाशातून कोसळणारा पाऊस, अशा परिस्थिती कोणीच ओळखीचा नाही, सोबत असलेला लहान भाऊ आणि प्रसुतीच्या मिनाक्षीला आलेल्या कळा, अशा परिस्थितीत प्रसंगावधान साधून रेल्वे जवानांनी तिला बहिण मानून देवदुतासारखी मदत केली. या प्रसंगानंतर मिनाक्षीच्या भावाने ही हकीकत ट्‌वीटरला शेअर केली. त्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने संबंधित जवानांचे कौतुक केले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com