esakal | मराठा आरक्षण प्रश्‍नी एकत्रीत लढा हवाः धैर्यशील मोहिते पाटील यांचे मत 
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षण प्रश्‍नी एकत्रीत लढा हवाः धैर्यशील मोहिते पाटील यांचे मत 

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातील नेते विविध भूमिका समाजाच्या समोर मांडत आहेत शिवसंग्रामचे विनायक मेटे हे समाजाने ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा म्हणून माध्यमातून सांगत आहेत तर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षण शक्‍य नाही म्हणून ईडब्लूएस आरक्षणाच्या बाजूने समर्थन करताना दिसतात.

मराठा आरक्षण प्रश्‍नी एकत्रीत लढा हवाः धैर्यशील मोहिते पाटील यांचे मत 

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज(सोलापूर) : मराठा आरक्षणाबाबत विविध नेते विविध भूमिका मांडत असल्याने संभ्रमावस्था निर्माण होत असून आरक्षण प्रश्नी एकत्रीत लढा हवा अन्यथा "पानिपत" अटळ असल्याचे मत धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

हेही वाचाः 50 दिवसानंतर सुटेना कोरोना शिक्षकांची ड्युटी 

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातील नेते विविध भूमिका समाजाच्या समोर मांडत आहेत शिवसंग्रामचे विनायक मेटे हे समाजाने ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा म्हणून माध्यमातून सांगत आहेत तर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षण शक्‍य नाही म्हणून ईडब्लूएस आरक्षणाच्या बाजूने समर्थन करताना दिसतात. खासदार छ. संभाजी राजे भोसले हे एसईबीसी आरक्षणाची लढाई लढू म्हणून सांगत आहेत तर खासदार छ.उदयनराजे भोसले आम्हाला आरक्षण नाही तर कुणालाही नाही म्हणून भावनिक आव्हान करत आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजात द्विधा मनःस्थिती निर्माण झाली आहे. या मराठा नेत्यांनी इतिहासातून बोध घेऊन एकजूट दाखवून लढाई लढावी अन्यथा मराठा आरक्षणाची वाटचाल पानिपताच्या दिशेने होईल. 

हेही वाचाः भागाईवाडीत समृध्द गाव योजनेचे ऑनलाइन प्रशिक्षण 

न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सकल मराठा समाजाच्या मनस्थितीचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही अशा परिस्थितीत समाजातील नेते आरक्षणाबाबत विविध मत विचार मांडून समाजाला अधिकच संभ्रमित करीत आहेत. समाजातील सर्व नेत्यांनी एकत्रीत येत एक भुमिका घेत लढाई लढावी अन्यथा काढलेले पन्नास मोर्चे व मराठा तरुणांचे बलिदान व्यर्थ जाईल. मराठा आरक्षणाचे "पानिपत" टाळायचे असेल तर सर्वांनी एकत्रीत येत एक भुमिका घेत अंतिम लढाई जिंकून न्याय हक्क मिळविने गरजेचे असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले 

संपादनः प्रकाश सनपूरकर 
 

go to top