Russia Ukirane War : एटीएम,बाजारपेठेत गर्दी, पण मनामध्ये भीती कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिजीत काका चव्हाण

Russia Ukirane War : एटीएम,बाजारपेठेत गर्दी, पण मनामध्ये भीती कायम

मंगळवेढा: युक्रेन आणि रशिया यांच्यातील युध्द जन्म परिस्थितीमुळे जगाचे लक्ष या देशाकडे आहे. आम्ही शिकत असलेल्या दनिप्रो शहरातील जनजीवन मात्र सुरळीत आहे. नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत अशी प्रतिक्रिया मध्ये चौथ्या वर्षाला शिकत असलेल्या तालुक्यातील आंधळगाव येथील अभिजीत काका चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा: Solapur : शिवसेना पराभूत! जिल्ह्यात राष्ट्रवादी अव्वल तर भाजपची आगेकुच

युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेली तालुक्यातील 6 मुले अडकल्यामुळे तिथल्या युद्धजन्य परिस्थिती मुळे पालकांसह तालुकावाशीय चिंतेत आहेत आज युक्रेन मधील परिस्थितीबाबत माहिती घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी व्हाट्सअप कॉल द्वारे अभिजित चव्हाणशी संपर्क साधून यावर माहिती जाणून घेतली.तो म्हणाला हवाई हल्ले सुरू झाल्यानंतर एक मार्च चे तिकीट बुक केले होते मात्र हल्ल्यानंतर हवाई सेवा बंद ठेवल्यामुळे येथे बसून राहावे लागले येथील शासनाने सर्वांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आलेले आहेत काही ठिकाणी शिक्षण ऑनलाइन तर काहीचे शिक्षण ऑफलाईन ठेवले. ज्यावेळेस परिस्थिती पूर्ववत होईल त्यावेळी पुन्हा शिक्षण सुरू करण्याबाबत सांगण्यात आले.

हेही वाचा: Solapur : शिवसेना पराभूत! जिल्ह्यात राष्ट्रवादी अव्वल तर भाजपची आगेकुच

भारतीय रहिवाशांना दूतावासाकडून सातत्याने विचारणा केली जात आहे याबाबतची माहिती घेतली जात आहे शासनाच्या अधिकृत सूचना आल्याशिवाय काहीही हालचाल करू नये व तुमच्यापर्यत आलेल्या फेकन्यूज वर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले आहे सध्या आम्ही शिकत असलेले शहरामध्ये दुकाने,मॉल सुरू आहेत एटीएम वर पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत मात्र शहरामध्ये बंद करण्याबाबत प्रशासनाच्या सूचना नाहीत इथून रशियाकडून हल्ले करण्यात आलेली ठिकाणे लांब आहेत भारतीय दूतावासाकडून आम्हाला पोलंड, हंगेरी,रोमानिया या देशाच्या माध्यमातून स्वदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगण्यात येत आहे या भागातील शिक्षणावर बोलताना अभिजित चव्हाण म्हणाला या भागातील शिक्षण दर्जेदार आहे व कमी खर्चाचे आहे. आपल्याकडील शुल्क परवडणारे नाही. म्हणून दनिप्रोपेत्रोवस्क स्टेट मेडिकल अकॅडमी या ठिकाणी प्रवेश घेतला. देशातील इतर विद्यार्थ्यांची संख्या देखील जास्त आहे या भागात लोकसंख्या आणि रुग्णाची संख्या कमी असल्यामुळे प्रत्यक्ष वैद्यकीय शिक्षणाचे प्रात्यक्षीक करता येत नाही. त्यामुळे इथल्या शिक्षणावर प्रात्यक्षिक भारतात विविध आजारांची निगडित रुग्ण सापडत असल्यामुळे तिथेच करावी लागणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे खाद्यपदार्थाची महागाई वाढली असून युध्दजन्य बातम्याने झालेल्या भितीमुळे मंगळवेढ्यातून मित्रमंडळी व आईवडिल सातत्याने फोनवर संपर्क विचारणा करीत आहे.

Web Title: Russia Ukirane War Atm Market Crowds But Fear Mind

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurWarRussia
go to top