
रशिया युक्रेन युद्धाचा सोन्याच्या दरावर परिणाम; तोळ्याला एक हजारांनी घट
सोलापूर : रशिया-युक्रेन युद्धाला सुरवात होताच सोन्याचे भाव कडाडले असले तरी मागील चोवीस तासात ५२ हजार २०० रुपयांवर गेलेले भाव शुक्रवारी (ता. २५) ५१ हजार २०० रुपये म्हणजे एक हजार रुपयांनी कमी झाले. युद्ध सुरूच राहिल्यास सोन्याचे भाव ५४ हजार रुपयांच्या वर जातील असा अंदाज आहे.
मागील आठवड्यापासून सोन्याच्या भावावर युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत. शेअर बाजाराच्या पाठोपाठ पुन्हा एकदा सोन्याच्या बाजाराला फटका बसला आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली आहे. त्यासोबत इंधन, शेअर बाजार याही क्षेत्रावर विपरित परिणाम दिसू लागले आहेत. सोन्याच्या बाजारावरदेखील परिणाम झाले आहेत. अजूनही सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. लग्नसराईच्या आणखी चार तारखा शिल्लक राहिल्या आहेत. लग्नसराईचा खरेदीचा हंगाम बऱ्यापैकी संपत चालला आहे. पण गुंतवणूकदार मात्र वाढत्या दराच्या संधीचा लाभ घेण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय तारण व मोडीचे व्यवहार देखील वाढण्याची चिन्हे आहेत. पूर्वी कमी दराने घेतलेले सोने जादा किमतीने मोडीत काढण्याचे व्यवहार वाढत चालले आहेत.
ठळक बाबी
लग्नसराईला भाववाढीचा फटका नाही
५२ हजारांपेक्षा अधिक गेलेले भाव ५१ हजार ७०० पर्यंत कमी झाले
युद्ध, इंधन, गोल्ड करन्सी, डॉलर- रुपया समीकरण ही मुख्य कारणे
लग्नसराईच्या चार तारखा शिल्लक
गुंतवणूकदारांचे भाववाढीवर लक्ष
सर्वसामान्यांचे मोड व तारण व्यवहार वाढीस
Web Title: Russia Ukraine War Raises Market Uncertainty Gold Fell By A Thousand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..