

Aherwadi Crime News Young Man Sachin Killed At 24 Over Alleged Illicit Relationship Suspicion Relatives Face Murder Case
sakal
दक्षिण सोलापूर : आहेरवाडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून आणि जुन्या वादाच्या कारणावरून २४ वर्षीय सचिन अभिमन्यू सासवे याचा कुऱ्हाड, सत्तूर आणि चाकूने वार करून खून करण्यात आला. शनिवारी मध्यरात्री दोन ते पहाटे पाचच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.