esakal | 'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका शिवसेनेची!' | Political News
sakal

बोलून बातमी शोधा

'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका शिवसेनेची!'

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली.

'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका शिवसेनेची!'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना (Shiv Sena) ठरलेले लग्न मोडून कॉंग्रेस (Congress) व राष्ट्रवादीबरोबर (NCP) पळून गेली. शिवसेना - भाजप (BJP) महायुतीने लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली. त्यामध्ये जनतेने महायुतीला आशीर्वादही दिला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली. भाजपबरोबर ठरलेल लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली अन्‌ मोकळी झाली. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) म्हणण्यानुसार शिवसेना जर स्वतंत्र निवडणूक लढली असती तर त्यांना कळलं असतं, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.

हेही वाचा: माढा तालुक्‍यातील भोसरे येथे पाच घरांवर सशस्त्र दरोडा! एक जखमी

आज (मंगळवारी) रयत क्रांती संघटनेकडून उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त सदाभाऊ खोत सोलापूरला आले आहेत. मोर्चापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, या अगोदरच्या विधानसभेत भाजपने स्वतंत्र निवडणूक लढून चांगल्या जागा मिळवल्या आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशामध्ये शेतकरी आंदोलना दरम्यान आठ जणांना जीव गमवावा लागला, त्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणाऱ्या क्रूरक्रर्म्यांना फासावर लटकवावा, अशी मागणीही सदाभाऊंनी केली.

हेही वाचा: MPSC ची ना वाढली वयोमर्यादा ना निघाली 15 हजारांची भरती !

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे एक विदूषक आहे. महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे राज्यात अतिवृष्टीमुळे जे संकट उभं टाकलं आहे, त्यासाठी पंचनामे न करता सरसकट तातडीने खरीप पिकाला 60 हजार आणि बागायती पिकाला एक लाख रुपये प्रतिएकर अनुदान द्या, अशी मागणी सदाभाऊंनी केली.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

loading image
go to top