

सोलापूर : न्यु पाच्छा पेठेतील अण्णा भाऊ साठे नगरातील नवनाथ युवक मंडळाच्या देवीच्या मंदिराचा दरवाजा उघडून तेथील दानपेटी व पितळीची भांडी, चांदीची मुर्ती चोरुन नेणाऱ्या दोघांना सदर बझार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील चोरीचे साहित्य देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे.