esakal | आधुनिक वैद्यक संशोधनामुळे सुरक्षित मातृत्व मिळवणे शक्‍य !
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षित मातृत्व

आधुनिक वैद्यक संशोधनामुळे सुरक्षित मातृत्व मिळवणे शक्‍य !

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

वाढत्या वयातील गर्भधारणा या सामाजिक समस्येमुळे सुरक्षित मातृत्व ही मोठी सामाजिक गरज बनली आहे.

सोलापूर : वंध्यत्वाच्या समस्येतून (Problems of infertility) बाहेर पडत सातत्याने विकसित होणाऱ्या वैद्यकीय तंत्राचा (Medical system) उपयोग करत सुरक्षित मातृत्व (Safe motherhood) ही संकल्पना व्यापक बनत चालली आहे. वाढत्या वयातील गर्भधारणा या सामाजिक समस्येमुळे सुरक्षित मातृत्व ही मोठी सामाजिक गरज बनली आहे. सर्वसाधारणपणे महिलांचे गर्भधारणेचे वय वाढत चालले आहे. महिलांचे करिअर व इतर कारणांमुळे उशिरा होणारे विवाह, विवाहानंतर मूल प्राप्त करण्याच्या निर्णयास उशीर यांसारखी अनेक सामाजिक कारणे वंधत्वाच्या संदर्भात आढळून येतात. याशिवाय पती व पत्नीमधील गर्भधारणेस असणारे अडथळे दूर करणे हा देखील वंध्यत्व उपचाराचा एक भाग आहे. (Safe Motherhood Day : Modern medical research has made it possible to achieve safe motherhood)

हेही वाचा: "पीएसआय'ने स्वीकारली साडेसात लाखांची लाच! "लाचलुचपत'ने पकडले रंगेहाथ

दिवसेंदिवस शिक्षण व करिअरसाठी मुलींचे विवाह उशिरा होत आहेत. तसेच मधुमेह (Diabetes), रक्तदाब (blood pressure) यांसारख्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याने वाढत्या वयाच्या गर्भधारणेसाठी हे आजार गुंतागुंत निर्माण करतात. सर्वसाधारणपणे महिलांचे वय 20 ते 30 वर्षे असावे. या वयोगटातील महिला नैसर्गिक मातृत्वासाठी नैसर्गिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यानंतर म्हणजे 30 ते 40 वर्षे वयापर्यंत महिलेस मातृत्व मिळताना अनेक अडथळे निर्माण होतात. सुरक्षित मातृत्वासाठी एकाच छताखाली निदान, तपासण्या, प्रसूती अशा सेवा असतील तर निरोगी आईच्या हातात निरोगी बाळ देण्याचा प्रवास सुखकर होऊ शकतो. महिलांमध्ये कायम दिसणारा रक्तक्षय आजारापासून सुरवात होते. पती व पत्नीच्या तपासण्या करून गर्भधारणेस असलेले तांत्रिक अडथळे दूर केल्यास गर्भधारणा होऊ शकते. कृत्रिम गर्भधारणा देखील करण्याचे तंत्र उपलब्ध झाले आहे. इतर आजारांवर नियंत्रण ठेवत गर्भधारणा ते प्रसूती हे दोन्ही टप्पे सुरक्षित करून निरोगी मातृत्व मिळवले जाऊ शकते. वंध्यत्व निवारणामध्ये हा कालावधी सर्वाधिक आव्हानात्मक असतो.

हेही वाचा: हॅलो! तुमची तब्येत कशी आहे?

वंध्यत्वाची सामाजिक कारणे

  • महिलांचे शिक्षण व करिअर आदी कारणांमुळे होणारे उशिरा विवाह

  • विवाहानंतर गर्भधारणा लांबवणे

  • मधुमेह, रक्तदाबासारख्या इतर आजारांचे गुंतागुंतीचे अडथळे

  • वंध्यत्वाचे लवकर निदान न करणे

  • वैद्यकीय तपासणी न करता नवस, उपवासासारखे उपाय करत अधिक उशीर करणे

सुरक्षित मातृत्वासाठी उपयुक्त बाबी

  • महिलांना वय 20 ते 30 वर्षे सुरक्षित मातृत्वाचा काळ

  • पती-पत्नी संबंधातील मातृत्वाच्या अडथळ्यासाठी उपचार व समुपदेशन

  • गर्भधारणेसाठी आधुनिक वैद्यकीय संशोधनाची मदत

  • अनुवंशशास्त्राच्या आधुनिक ज्ञानाचा प्रभावी उपयोग

  • सतत विकसित होणाऱ्या वैद्यकीय संशोधनाचा उपयोग

सुरक्षित मातृत्व ही संकल्पना म्हणजे निरोगी आईच्या हातात निरोगी बाळ अशा प्रकारची आहे. त्यासाठी एकाच छताखाली वंध्यत्व निदान, उपचार, गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंतची प्रक्रिया सुव्यवस्थित होणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये सर्व वैद्यकीय संशोधित तंत्राचा वापर करत सुरक्षित मातृत्वाचे ध्येय गाठले जाते.

- डॉ. मिलिंद पाटील, शोभा नर्सिंग होम प्रा. लि., इंडो जर्मन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर अँड पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट, सोलापूर

loading image