Sakal Idols of Maharashtra : ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’चे आज वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Idols of Maharashtra

Sakal Idols of Maharashtra : ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’चे आज वितरण

सोलापूर : ‘सकाळ’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र अंतर्गत एक्सलन्स पुरस्कारा’चे वितरण उद्या (मंगळवारी) हॉटेल बालाजी सरोवर येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

सोलापूर, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान होणार आहे. या पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

यांचा होणार सन्मान

सोलापूर डॉ. अकलाख वडवान (शिक्षण), तुकाराम गायकवाड (बांधकाम व्यावसायिक), डॉ. शलाका पाटील (वैद्यकीय), सीए धीरज जवळकर (हॉटेल व्यावसायिक), दीपक मुनोत (महावीर बँक), डॉ. सुमीत मोरे (वैद्यकीय), योगेश धर्माधिकारी (विमा क्षेत्र), संजय मंथा (विमा क्षेत्र), डॉ. इंद्रजित यादव (शैक्षणिक), जयवंतराव पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, हणमंत दुधाळ (सामाजिक कार्य), प्रशांत बाबूराव गायकवाड (सामाजिक कार्य), विश्वंभर पाटील (कर सल्लागार), जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी (सेंद्रिय खते, औषधे), माणगंगा उद्योग समूह (उद्योग-व्यवसाय), युवराज काळे (उद्योग -व्यवसाय), रमेश भोईटे (सरपंच), आप्पासाहेब निकत (प्रशासकीय अधिकारी), सुशीलकुमार दळवे (सरपंच), महादेव भांगे (प्रगतशील शेतकरी), महादेव पवार (शिक्षक).

लातूर जगदीश स्वामी (टूर्स अँड ट्रॅव्हल्स), दिनेश बेंबडे (शिक्षण), उदय पाटील (बांधकाम), राहुल केवळराम (शिक्षण), इसरार सगरे (बँकिंग), नितीन शेटे (बँकिंग), श्‍यामलीला बावगे (शिक्षण), दिनेश दिलीपराव माने (बांधकाम), अजित पाटील-कव्हेकर (राजकीय), डॉ. शिल्पा लटूरिया (हेल्थ केअर),

उस्मानाबाद ; श्रीनिवास फुलसुंदर (समाजकार्य), सुधीर सस्ते (बॅंकिंग).

धवलक्रांतीचे शिलेदार गिरीश चितळे

गिरीश चितळे हे बी. जी. चितळे उद्योग समूहाचे भागीदार तसेच चितळे ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. पुळूज (जि. सांगली) येथील चितळे डेअरी ही देशातील सर्वांत जुन्या डेअरींपैकी एक आहे. मागील ८१ वर्षांपासून ती कार्यरत आहे. या डेअरीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील १०० संकलन केंद्रांवरून दुधाचे संकलन होते. डेअरीत अनेक दूध उत्पादनांची निर्मिती होते. या उत्पादनांची महाराष्ट्रभरात विक्री होते. चितळे यांनी ५० सॅटेलाइट डेअरी फार्म व १० हजार छोट्या फार्म्सच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. याशिवाय विस्तार कार्यातून पशुवैद्यकीय सेवा देखील पशुपालकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पाळीव प्राण्यांना इअर टॅग देऊन त्यामार्फत सर्व जनावरांचा डेटा संकलनाची व्यवस्था चितळे डेअरीने केली आहे. तसेच कॉग्निझंट, इंटेल आदी संगणक कंपन्यांसमवेत डेअरी सॉफ्टवेअर जे की, विकसनशील देशांसाठी उपयुक्त ठरू शकते, त्यासाठी योगदान दिले आहे. गिरीश चितळे हे रोटरी क्लब, आभाळमाया फाउंडेशनचे पदाधिकारी, भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त तसेच राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.