esakal | व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून भाज्यांची खरेदी-विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Sale of vegetables through WhatsApp at Pandharpur

शहरात विक्रीसाठी नगरपालिकेचे पास 
या व्हॉट्‌सऍप ग्रुपमुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना घरबसल्या भाजीपाल्याची खरेदी-विक्री करता येणार आहे. बंद काळात शेतकऱ्यांना पंढरपूर शहरात भाजीपाला विक्री करण्यासाठी नगरपालिकेने पास उपलब्ध करून दिले आहेत. अशा परवानाधारक व्यापारी व शेतकऱ्यांना फिरून विक्री करता येणार असल्याचे समितीचे उपसभापती विवेक कचरे यांनी सांगितले.

व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून भाज्यांची खरेदी-विक्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेला भाजीपाला बाजारही आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी बाजार समितीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केला आहे. त्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी भाजीपाल्याची खरेदी-विक्री करावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी केले आहे. 

या संदर्भात आज (ता. 16) बाजार समितीच्या कार्यालयात आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. तीमध्ये पुढील आदेशापर्यंत बाजार समितीमधील भाजीपाल्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीने यापूर्वीच बेदाणा, डाळिंब आणि केळीचे सौदे बंद केले आहेत. अत्यावश्‍यक सेवा म्हणून बाजार समितीने लोकांची सोय व्हावी म्हणून भाजीपाला खरेदी-विक्रीचे लिलाव सुरू ठेवले होते. दरम्यान, सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने सर्वत्र घबराट निर्माण झाली आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी येथील भाजीपाल्याचा बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
बंद काळात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीने पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे. त्यानुसार बाजार समितीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी बाजार समिती या नावाने एक व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केला आहे. यामध्ये भाजीपाला विक्री करणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा समावेश केला आहे. या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून भाजीपाल्याची खरेदी-विक्री केली जाणार आहे. या ग्रुपमध्ये भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याचे फोटो आणि किंमत टाकल्यानंतर व्यापारी संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधून भाजीपाल्याची खरेदी करतील.

loading image