सोलापूरच्या ग्रामीण भागात उद्यापासून सलूनची दुकाने सुरू 

salun
salun
Updated on

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील (महापालिका हद्द वगळून व बिगर प्रतिबंधित क्षेत्रातील) केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर चालू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश आज त्यांनी काढला आहे. उद्यापासून (शनिवार) ही दुकाने सुरू होणार आहेत. 

यापूर्वी 31 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर यांना परवानगी दिलेली आहे अशीच केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर उद्यापासून सुरू होणार आहेत. इतर केशकर्तनालय, सलून, ब्युटी पार्लर व स्पा सुरू होणार नाहीत. ही परवानगी देत असताना हेअर कट, हेअर डाय, व्हॅक्‍सिंग या कामांनाच परवानगी देण्यात आली आहे. तथापि त्वचेशी संबंधित सेवा दाढी, फेशियल मसाज या कामांना तूर्तास परवानगी देण्यात आली नसल्याने ग्राहकांना या सेवा मिळणार नाहीत. ज्या सेवा मिळणार नाहीत त्याची माहिती दर्शविणारा फलक दुकानाच्या दर्शनी भागावर ठळकपणे लावणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. 

या ठिकाणी काम करणाऱ्या चालक/कर्मचाऱ्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ग्लोज, ऍप्रन व मास्कचा वापर करावा. कामाच्या ठिकाणी खुर्च्या प्रत्येक वेळी सेवा दिल्यानंतर निर्जंतुक कराव्यात. दुकानातील वापरातील भाग, जमिनीचा पृष्ठभाग दर दोन तासांनी निर्जंतुक करावा. ग्राहकांसाठी डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिन याचा वापर करावा. नॉन डिस्पोजेबल साधनाचा प्रत्येक वापरानंतर निर्जंतुकीकरण करावे. प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागावर ग्राहकांसाठीच्या सूचना ठळकपणे लावण्याचा आदेशही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Lane Change Leads to Deadly Crash Near Solapur; Family Devastated
Ladki Bahin Yojana
maharashtra
Fuel Conservation: Mangalwedha Chairperson Deepali Tad Opts for ST Bus Ride
Marathi News Esakal
www.esakal.com