
Samadhan Autade : मंगळवेढा शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्दबाबत लवकरच बैठक; आवताडे
मंगळवेढा : शहराच्या प्रारूप विकास रचनेची अधिसूचना रद्द होणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मंगळवेढा प्रारूप विकास रचनेची अधिसूचना रद्द होणेबाबत मागणी केली असून लवकरच बैठक लावून यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आ. आवताडे यांनी मुंबईवरून दिली.
नगरपालिकेच्या शहर विकास आराखड्यामध्ये 300 पेक्षा अधिक मालमत्ता बाधित होणार असल्याने यातील बाधितांनी चार दिवसापूर्वी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून हा आराखडा रद्द करण्याची मागणी केली यामध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले.
परंतु आ.अवताडे गैरहजरी वरून काहींनी उलटसुलट चर्चा देखील केल्या मात्र त्यावेळी माध्यमाशी बोलताना शहरवासीयांना विश्वासात न घेता अधिकाऱ्याने हा आराखडा केला. नागरिकांचे नुकसान होऊ देणार नाही असा शब्द दिला होता नंतर त्यांनी थेट मुंबई गाठले व मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतची माहिती त्यांना दिली.
व या भेटीबाबत अधिक माहिती देताना आ आवताडे म्हणाले की नगरपरिषदे कडील महाराष्ट्र प्रादेशिक व नियोजन नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत शहराच्या प्रारूप विकास रचनेची योजना जाहीर करण्यात आली होती ,सदर शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातील प्रस्तावित आरक्षित प्रयोजन बहुतांश खाजगी मिळकती धारकांवर अन्यायकारक आहेत.
त्याचबरोबर सदर प्रारूप विकास योजनेअंतर्गत प्रयोजनासाठी जागा आरक्षित करत असताना शासकीय जमिनी अथवा नगरपरिषद मालकीच्या जागा आरक्षित न करता खाजगी मालकीच्या जागा आरक्षित केलेल्या आहेत. शहराच्या मुख्य मार्गावर पार्किंग जागा आरक्षित न ठेवता शहरातील विरळ लोकवस्ती असलेल्या जागी पार्किंगची जागा आरक्षित केली आहे.
एकंदरीत नगरपरिषदे कडील प्रारूप विकास आराखडा दिशाहीन केला असून नगरपरिषदेत सत्तेवर असणाऱ्या तत्कालीन सत्ताधार्यांनी राजकीय डावपेच डोळ्यासमोर ठेवून प्रस्तावित आराखडा केला
पण लोकांच्या हक्कावर गदा आणणारा सदर विकास प्रारूप योजनेचा आराखडा रद्द होण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली असून लवकरच बैठक लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे आ आवताडे म्हणाले.