Sambhaji Bhide: "...तर तुमच्या मिशा कापू"; महिला संघटनेचा संभाजी भिडेंना इशारा

नुकतच भिडेंनी महिलांबद्दल वटपौर्णिमेच्या निमित्तानं वादग्रस्त विधान केलं होतं.
Sambhaji Bhide Controversial statement
Sambhaji Bhide Controversial statementesakal
Updated on

सोलापूर : कायम वादग्रस्त विधानं करणारे कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नुकतंच महिलांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुन त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला.

यापार्श्वभूमीवर सोलापुरातील एका महिला संघटनेनं त्यांना मिशा कापण्याचा इशारा दिला आहे. "भिडे गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये नाहीतर आम्ही त्यांच्या मिशा कापू" असं सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वूमन्स (WOW) महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी म्हटलं आहे. (Sambhaji Bhide again gives controvertial statement about women WOS organization leader Vidya Lolge warns him)

Sambhaji Bhide Controversial statement
Modi on Rahul Gandhi: लोकसभेत राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या विधानावर PM मोदींची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, संपूर्ण हिंदू...

वर्ल्ड ऑफ वूमन्स(WOW) या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे म्हणाल्या,"भिडे गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये, हे खूप अति होत असून आता ऐकवलं जातं नाही. आम्ही काय करावं? आणि काय करु नये? हे सांगणारे भिडे गुरुजी कोण आहेत? ते आमचं घर चालवत नाहीत. यापुढे त्यांनी पुन्हा असं वादग्रस्त विधान केलं तर त्यांचा पेहराव असणाऱ्या धोतरावर आम्ही बोलू शकतो. त्यांनी वाढवलेल्या मिशा ही आम्हाला कापाव्या लागतील"

Sambhaji Bhide Controversial statement
Delhi burari kand: तीच तारीख, तीच पद्धत... 6 वर्षांनंतर दिल्लीच्या बुरारीसारख्या मध्यप्रदेशात एकाच कुटुंबातील 5 जणांचे आढळले मृतदेह

भिडे काय म्हणाले होते?

पुण्यात नुकतंच बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, "आपल्याला वारकरी-धारकरी संगम हा कार्यक्रम करायचा आहे. त्याचबरोबर गोमाता, भारतमाता, वेदमाता यांसारख्या 7 मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत होय. त्यामुळं वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, तिथं फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावं"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.