Sambhaji Bhide : संभाजी भिडे चा नेमका बोलवता धनी कोण ? कॉग्रेसचा मोहोळ तहसीलवर मोर्चा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या संभाजी भिडे सारख्या विकृतीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी किशोर पवार यांनी केली.
Sambhaji bhide
Sambhaji bhideSAKAL

मोहोळ: महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले यांच्या सारख्या राष्ट्रीय अस्मिता असणाऱ्या राष्ट्र पुरुषांवर टीका करून समाजात तेढ निर्माण करून राज्यातील जातीय सलोखा बिघडविणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या समाज कंटकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयावर सोमवार ता 31 रोजी मोर्चाकाढण्यात आला.

मोहोळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनेही शहराध्यक्ष किशोर पवार यांनी निषेध व्यक्त केला. संभाजी भिडे चा नेमका बोलवता धनी कोण आहे हे आता जनतेला कळून चुकले आहे .समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा आरोप सुलेमान तांबोळी यांनी केला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या संभाजी भिडे सारख्या विकृतीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी किशोर पवार यांनी केली.

Sambhaji bhide
Sambhaji Bhide Controversy : भिडे यांच्यावर कारवाई करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजपशी त्यांचा संबंध नाही

यावेळी काँग्रेसचे काँग्रेस तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, सुभाष पाटील, अशोक देशमुख, रफिक पटेल, अविनाश टेळे,राजेंद्र मोट, प्रकाश सपाटे, सिद्धेश्वर वराडे, संतोष शिंदे, मनोज धडके,

कुलदीप पवार, तय्यब शेख, आप्पासाहेब गायकवाड, आनंद गायकवाड, अजित जगताप ,ज्येष्ठ नेते बिलाल शेख, रतन कसबे , यशोदा लोखंडे, सिद्राम पवार ,दाजी कोकाटे, बिरा खरात, राजेंद्र सरजी, नानासाहेब मोरे, राहुल कुर्डु ,हरिभाऊ गायकवाड ,मुन्ना हरण मारे ,कांतीलाल राऊत, वैभव कुचेकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com