esakal | नागझरी नदीपात्रातून दहिटणे हद्दीत 25 लाख किमतीची 354 ब्रास वाळूचोरी
sakal

बोलून बातमी शोधा

नागझरी नदीपात्रातून दहिटणे हद्दीत 25 लाख किमतीची 354 ब्रास वाळूचोरी

गेल्या वर्षापासून ते 9 जुलै 2021 पर्यंत दहिटणे (ता. बार्शी) येथील नागझरी नदी पात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे.

नागझरी नदीपात्रातून दहिटणे हद्दीत 25 लाख किमतीची वाळूचोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैराग (सोलापूर) : गेल्या वर्षापासून ते 9 जुलै 2021 पर्यंत दहिटणे (ता. बार्शी) येथील नागझरी नदी (Nagzari River) पात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. एकूण 354.3 ब्रास वाळू, ज्याची अंदाजे एकूण किंमत 24 लाख 80 हजार रुपये आहे, ती वाळू कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणी भा. दं. वि. कलम 379, पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 प्रमाणे तलाठी समीर कृष्णा जाधव यांनी वैराग पोलिसात (Vairag Police) अज्ञाताविरुद्ध फिर्याद दाखल केली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

हेही वाचा: उपळाईच्या शेतकऱ्याने नादच केलाय थेट! 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंब

वैराग पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी, बार्शीच्या तहसीलदारांच्या आदेशावरून दहिटणे गावचे तलाठी समीर जाधव हे 9 जुलै 2021 रोजी सकाळी सुर्डीचे तत्कालीन मंडल अधिकारी शरद शिंदे, दहिटणे पोलिस पाटील संदीप पाटील व कोतवाल मारुती ढोबळे असे सर्वजण मिळून नागझरी नदीपात्रातील वाळू चोरीचा पंचनामा करण्यासाठी गेले असता, दहिटणे येथील नागझरी नदीपात्रात पाच विविध ठिकाणी खड्डे खोदून वाळू चोरून नेल्याचे आढळून आले. वरील ठिकाणावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने 2020 पासून 9 जुलै 2021 पर्यंत वाळू चोरून नेल्याचे दिसून आले.

हेही वाचा: धोत्रे येथील पोलिस पाटलाला तरुणाने भोसकले! प्रकृती गंभीर

याबाबत बार्शीच्या तहसीलदारांना त्या वेळी पंचनामा रिपोर्ट कळविण्यात आला असता 1 सप्टेबर 2021 रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निघाले. यावरून अज्ञात वाळू चोरांविरुद्ध वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

बातमीदार : बलभीम लोखंडे

loading image
go to top