Solapur : सांगोला सहकारी सुतगिरणीची निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangola farmer Cooperative Sutgirni Election

Solapur : सांगोला सहकारी सुतगिरणीची निवडणूक बिनविरोध

सांगोला : सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या निवडणूकीत 17 जागेसाठी 17 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिलेल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच होऊ घातलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सभासदांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

स्थापनेपासूनच  शेतकरी सहकारी सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होत आहे. बिनविरोध निवडणुकीमध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नातवांची चर्चा होत असली तरी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचीही मोलाची मदत लावली आहे.

सूतगिरणीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी 17 जागेसाठी 73 अर्ज दाखल झाले होते. 12 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यात 17 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध तर 56 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र वैध झाले होते. 

शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये 17 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवार 15 जुलै पर्यंत तब्बल 73 अर्ज दाखल झाले होते. सूतगिरणीच्या 11 हजार 560 सभासदांपैकी कापूस उत्पादक शेतकरी 7 हजार 93, तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी 4 हजार 467 असे एकूण 11 हजार 560 सभासद (मतदार) आहेत. तर संस्था प्रतिनिधी मतदार संख्या 81 आहेत.

दरम्यान राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने 30 सप्टेंबर पर्यंत स्थगित केल्या होत्या. त्यानंतर सहकार विभागाने 12 ऑक्टोंबर पासून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सतरा जागेसाठी फक्त 17 उमेदवार शिल्लक राहिल्याने ही लक्षवेधी निवडणूक बिनविरोध झाली आहे ही बिनविरोध निवडणूक पार पडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षासह बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर सर्वच पक्षांनी मदत केली.

नुतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे -

कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघ -

 • चंद्रकांत गणपतराव देशमुख (सांगोला)

 • अण्णासाहेब गणपतराव देशमुख  (सांगोला)

 • संतोष शांताराम पाटील (महूद)

 • नितीन कृष्णा गव्हाणे (कडलास)

 • भारत हणमंत बंडगर (अनकढाळ)

 • बाबासो रामचंद्र करांडे (लोटेवाडी)

 • विश्वंभर नारायण काशीद (पंढरपूर)

 • बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघ -

 • इंजि.मधुकर विठ्ठल कांबळे (सांगोला)

 • अंकुश लक्ष्मण बागल (खिलारवाडी)

 • विक्रांत महादेव गायकवाड (कडलास)

 • दिलीप शिवाजी देशमुख (कोळे)

 • संस्था प्रतिनिधी मतदार संघ -

 •  सागर भगवान लवटे (लोटेवाडी)

 • अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ -

 • बाळासाहेब संदिपान बनसोडे (सांगोला)

 • महिला राखीव मतदार संघ -

 • ताई शिवाजी मिसाळ (पाचेगाव)

 • सीतादेवी सुनील चौगुले (गुंजेगाव, ता. मंगळवेढा)

 • इतर मागासवर्गीय मतदार संघ -

 • प्रभाकर एकनाथ माळी (सांगोला)

 • वि.जा/ भ.ज./वि.मा.प्र.मतदार संघ -

 • कुंडलिक पंढरी आलदर (कोळे)