

Sangola Farmers Unity Brings Water Success as Tembhu Water Reaches Methwade After Strong Collective Water Movement
sakal
- दत्तात्रय खंडागळे
सांगोला : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला तालुक्यात यंदा पाण्यासाठी शेतकऱ्यांनी दाखविलेल्या अभूतपूर्व एकजुटीला यश आले आहे. टेंभू उपसा योजनेचे पाणी मान नदीत सोडल्यानंतर ते तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या मेथवडेपर्यंत पोहोचले, तर नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक पाचलाही पाणी सोडण्याचा निर्णय झाला. पाण्याच्या प्रश्नावर पक्ष, गट आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी एकत्र आल्यानेच हा लढा यशस्वी झाल्याची भावना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.