

Demand for Ganpatrao Deshmukh Memorial in Central Sangola
sakal
सांगोला : सांगोला तालुक्याचे तब्बल ५५ वर्षे प्रतिनिधित्व करून लोकनेते म्हणून ओळख निर्माण केलेले स्व. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाची उभारणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी करावी, अशी आग्रही मागणी सांगोला मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारकडे केली. सांगोला शहर व उपनगराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी लक्षवेधी सूचना मांडल्या.