सांगोला ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईट कनेक्‍शन्सची थकबाकी 39.40 कोटी !

सांगोला ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईट कनेक्‍शन्सची थकबाकी 39.40 कोटी !
sreet-light
sreet-lightMedia Gallery
Updated on

एकीकडे कोरोना महामारीचे संकट तर दुसरीकडे स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठ्याच्या वीज कनेक्‍शन्स बंद केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सांगोला (सोलापूर) : सांगोला (Sangola) तालुक्‍यातील महावितरणकडील (MSEDCL) ग्रामपंचायतींच्या 451 स्ट्रीट लाईट कनेक्‍शनकडे 39 कोटी 40 लाख रुपयांची थकबाकी आहे. यातील 352 स्ट्रीट लाईट कनेक्‍शन तात्पुरत्या स्वरूपात बंद केली असून त्यांच्याकडे 29 कोटी 54 लाख थकबाकी आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या 170 पाणी पुरवठा कनेक्‍शनमधील 128 कनेक्‍शन तात्पुरत्या स्वरूपात बंद केले असून त्यांच्याकडे 4 कोटी 84 लाख रुपये थकीत असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता आनंदा पवार यांनी दिली. (Sangola gram panchayat street light connections are in arrears of Rs 39 crore)

sreet-light
सोलापूर जिल्ह्यातील 34 सराईत गुन्हेगारांना लावणार मोक्का !

तालुक्‍यात महावितरणकडून स्ट्रीट लाईटच्या 569 वीज कनेक्‍शन्स आहेत. यामध्ये 451 ग्रामपंचायती व 118 नगरपरिषदेची कनेक्‍शन्स आहेत. ग्रामपंचायतींच्या 451 स्ट्रीट लाईट कनेक्‍शनकडे एकूण 39 कोटी 40 लाख थकबाकी आहे. सध्या ग्रामपंचायतींच्या 352 स्ट्रीट लाईट कनेक्‍शन तात्पुरते बंद केले असून यांच्याकडे 29 कोटी 54 लाख रुपये थकीत आहेत. तालुक्‍यात 175 पाणीपुरवठ्याची वीज कनेक्‍शन्स असून यामध्ये 170 ग्रामपंचायतीचे तर पाच नगरपालिकेचे पाणी पुरवठा कनेक्‍शन्स आहेत. 175 पाणीपुरवठा कनेक्‍शनकडे एकूण सहा कोटी 83 लाख रुपये थकीत आहेत. सध्या ग्रामपंचायतींचे 170 कनेक्‍शनमधील 128 कनेक्‍शन्स तात्पुरत्या स्वरूपात बंद केली असून त्यांच्याकडे चार कोटी 84 लाख रुपये थकीत आहेत. वीज पुरवठा बंद केल्यानंतर सहा ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा कनेक्‍शनची काही रक्कम भरून कनेक्‍शन पुन्हा सुरू केली आहेत. तसेच नगरपालिकेच्या पाच कनेक्‍शन्सकडील एक लाख 42 हजार 460 रुपये भरले आहेत.

sreet-light
"या' कारणामुळे पोलिसांनी दाखल केला आमदार पडळकरांविरुद्ध गुन्हा !

तालुक्‍यात सध्या महावितरणकडून गावांमधून स्ट्रीट लाईट बंद केल्यामुळे अनेक गावंतील रस्ते गेल्या काही दिवसांपासून अंधारातच आहेत. एकीकडे कोरोना महामारीचे संकट तर दुसरीकडे स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठ्याच्या वीज कनेक्‍शन्स बंद केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पंधराव्या वित्त आयोगामध्ये विजेची थकीत रक्कम भरता येऊ शकेल. परंतु ग्रामपंचायतींचा आराखडा तयार असून अनेक ग्रामपंचायतींच्या आराखड्यात थकीत रक्कम भरणेचे नमूद केले नाही. 15 व्या वित्त आयोगामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने बदल करून महावितरणची थकीत रक्कम भरण्याची कार्यवाही करता येईल

- संतोष राऊत, गटविकास अधिकारी, सांगोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com