Dr. Babasaheb Deshmukh
esakal
सोलापूर : सांगोला तालुक्यात तरुणांच्या हातांना रोजगार देण्यासाठी तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी मागणी केली आहे. याशिवाय तालुक्यात डेटा सेंटर उभारण्यात (Sangola Industrial Estate) येणार असून, सोलारवर उभारणारे हे राज्यातील पहिले डेटा सेंटर असणार आहे. १२ गावे अद्याप टेंभू-म्हैसाळ योजनेपासून वंचित आहेत. नीरा उजवा कालव्यापासून तालुक्यातील काही गावांना पाणी मिळत नाही, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगोला आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांनी सांगितले.