
Sangola police crackdown: DJs seized at three locations, 8 booked for violating collector’s orders.
Sakal
सांगोला: सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत डीजे व लेझर लाइटच्या वापरावर बंदी घालूनही, सांगोला व परिसरात आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन ठिकाणी कारवाई करत आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.