Crime News : चोरीस गेलेल्या 26 मोटारसायकली सांगोला पोलिसांकडून केल्या जप्त

सांगोला पोलीसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करुन 26 दुचाकी हस्तगत करून एकुण 11 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना ताब्यात घेतले.
Bike Seized
Bike SeizedSakal
Summary

सांगोला पोलीसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करुन 26 दुचाकी हस्तगत करून एकुण 11 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना ताब्यात घेतले.

सांगोला - सांगोला पोलीसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करुन 26 दुचाकी हस्तगत करून एकुण 11 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

सांगोला पोलीस स्टेशनच्या हददीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्हयांचा तपास करीत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून संशयीत आरोपी महंमदहुसेन साहेब शेख (रा. रेवणेगल्ली, तांदुळमार्केट, मिरज, ता. मिरज, जि. सांगली), संतोष सिदधु शिंगे (रा. मिरज, ता. मिरज, जि. सांगली) यांस मिरज येथुन ताब्यात घेवून त्यांना सदर गुन्हयात अटक केली. अधिक तपास केला असता सदर आरोपीने मिरज, कागवाड व इतर जिल्हयातुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन 15 दुचाकी चोरल्याचे कबुली देवुन त्या मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे विक्री केल्याचे सांगीतले. त्याच्याकडून पोलिसांनी 15 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हा जप्त करण्यात आलेला मुददेमाल हा अंदाजे 8 लाख 35 हजार रुपये किंमतीचा आहे.

तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले गुन्हे शोध पथकाने संशयीत आरोपी सोपान वैजिनाथ वगरे (रा. गुंफावाडी, ता. लातुर, जि. लातुर), पप्पु उर्फ ज्ञानेश्वर रावसाहेब बुरंगे (रा. जवळा, ता. सांगोला), अमोल बिरा वगरे (रा. बुरंगेवाडी, ता. सांगोला) यांना सदर गुन्हयात अटक करून सोलापुर व इतर जिल्हयातुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन 11 दुचाकी चोरल्याचे कबुली देवुन त्या सांगोला तालुक्यातील जवळा, बुरंगेवाडी, तरंगेवाडी येथे विक्री केल्याचे सांगीतले. दोन लाख 80 हजार रुपयच्या 11 मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपीकडून एकुण 26 मोटरसायकली जप्त करून 11 लाख 15 हजार रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुददेमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे. अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरिक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. नागेश यमगर, स.पो.नि. प्रशांत हुले, पो.हे.कॉ. दत्ता वजाळे, पो.ना. अभिजीत मोहोळकर, पो.ना. बाबासाहेब पाटील, पो.ना. मेटकरी, पो.ना. नलवडे, पो.कॉ. सांवजी, पो.कॉ. संभाजी काशीद, युसुफ पठाण यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com