
-दत्तात्रय खंडागळे
सांगोला : कुस्ती हा पारंपरिक खेळ आहे. या खेळाची जपणूक करणे आज काळाची गरज बनली आहे. सांगोला तालुक्यात कुस्तीची आवड असणाऱ्या पैलवानांची संख्या अधिक असली तरी आधुनिक कुस्ती केंद्र नाहीत. सध्या कुस्तीमध्ये विविध प्रकार आले असल्यामुळे या खेळाची जपणूक करण्यासाठी ‘आधुनिक कुस्ती केंद्र’ निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये असे कुस्ती प्रकार खेळण्यासाठी सुविधा नसल्यामुळे पैलवान मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे.