Sangola News : शिक्षक-पदवीधर निवडणुकीत सांगोल्यात ‘एबीसी’ पॅटर्नची जोरदार चर्चा; पसंतीक्रमानुसार मतदारांची वर्गवारी करत स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला

Sangola Teacher Graduate Election ABC Pattern : सांगोला तालुक्यात शिक्षक-पदवीधर निवडणुकीत 'एबीसी' पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली असून, राजकीय पक्षांसह स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावत पसंतीक्रमानुसार मतदारांची वर्गवारी सुरू केली आहे.
voting

voting

ESakal

Updated on: 

सांगोला - सांगोला तालुक्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची यंदा चांगलीच चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांसह स्थानिक नेतेमंडळींनी लक्ष घातल्याने मतदानाच्या राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे. मतदारांचा कल कोणाकडे आहे, कोण पसंतीक्रमांक एक देणार, कोण दोन किंवा तीन क्रमांकाची पसंती देणार, याचा अंदाज घेण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्यांना ‘एबीसी’ अशी वर्गवारी देण्यात येत असल्याने सांगोला तालुक्यात सध्या ‘एबीसी पॅटर्न’ चांगलाच गाजत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com