
दत्तात्रय खंडागळे,
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघात यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली आहे. पाच हजार कोटींची विकासकामे असो अथवा तालुक्यातील लाडक्या बहिणींचीही म्हणावी एवढी साथ विद्यमान आमदारांना मिळाली नाही. दोन्ही आजी-माजी आमदारांच्या मतविभाजनाचा फायदाही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारास झाल्याचे चित्र दिसून आले.