
सोलापूर : शहरातील माने वस्तीत राहणाऱ्या सानिका गायकवाडने तायक्वांदो खेळात कमी वयात अन् कमी वेळात उंच भरारी घेतली आहे. आता पर्यंत सानिका गायकवाडने अनेक स्तरावरील स्पर्धेत विविध १८ पदकांची कमाई केली आहे. सानिका गायकवाड ही रावजी सखाराम हायस्कूलमध्ये शिकत असून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देणारी खेळाडू ठरत आहे. शाळेच्या वतीने ३५ ते ३८ वजन गटात ती खेळत आहे.