
कारखान्यात उपपदार्थ निर्मितीची सोय असून 65 के एल पी डी डीसलरीज निर्मिती होते
मंगळवेढा : माझं बोलणं कमी व काम जास्त असल्याने कारखान्याला ऊस घालणारे सर्व शेतकरी कामगार यांचं समाधान होईल असे काम आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगपती संजय आवताडे यांनी व्यक्त केले.आवताडे उदयोग समूहाने नुकताच खरेदी केलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टलरीज या कारखान्याचा “पहिला गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन” सोहळ्यात ते बोलत होते.
हा समारंभ ऊस उत्पादक शेतकरी आण्णाप्पा काकणगी व विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उभयतांचे शुभहस्ते सत्यनारायण महापूजा करून बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,अंबादास कुलकर्णी, मा. सभापती प्रदीप खांडेकर, सुधाकर मासाळ,सुरेश ढोणे,विजय माने, भैय्या कळसे, मोहन बागल, शांतीनाथ बागल, महेश चव्हाण, शेखर भोसले, दादा ढोले, आबासाहेब पाटील, लक्ष्मण जगताप, युवराज शिंदे,समाधान हेंबाडे, राजीव बाबर, शिवयोग्याप्पा पुजारी, बटू पवार, बसू पाटील, पप्पू काकेकर, सचिन शिवशरण, सौ.स्मिता म्हमाणे यांचेसह प्रा.येताळा भगत, सरोज काझी, प्रमोदकुमार म्हमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष आवताडे म्हणाले की, पाच हजार मे.टन गाळप क्षमता असलेला हा कारखाना आ.समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली आवताडे उदयोग समूहाने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आपल्या ताब्यात घेतला. कारखान्यात उपपदार्थ निर्मितीची सोय असून 65 के एल पी डी डीसलरीज निर्मिती होते.
तर 32 मेगावॅट को-जन निर्मितीही होते हा कारखाना सुरू झाल्याने सुमारे सातशे कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर 250 मोठ्या वाहनांचे करार झाले असून 200 डंपिंग ट्रॅक्टर व 200 बैलगाड्यांचेही करार केले असून सर्व यंत्रणा सज्ज झाली असून आ.समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचा 600 एकराचा परिसर असल्याने या परिसरात तरुणांना आणखी रोजगाराच्या संधी निर्माण करणार असल्याचेही अध्यक्ष संजय आवताडे यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक मोहन पिसे म्हणाले की, कारखाना सुरू झाल्याबरोबर दीड महिन्यानंतर को-जन वीजनिर्मिती सुरू होणार आहे त्याच बरोबर डिस्टलरीही सुरू होणार असून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रा. येताळा भगत, भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, सोमनाथ आवताडे, जमदाडे सर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कूर्मदास चटके, विनायक यादव, भारत निकम, बापू काकेकर, ऍड धनंजय जाधव, बिभीषण बेदरे, डॉ.ताणगावडे, गणेश गावकरे,
विकास पुजारी, बापूसाहेब मेटकरी, तानाजी पाटील, रावसाहेब राजमाने, शिवाजी रणे, सचिन चौगुले, चनबसू येनपे, नंदू जाधव, सुहास पवार, सुभाष सरगर, बालाजी मेटकरी, प्रसाद सातपुते, समाधान घायाळ, अमोल माने, जकापा नरुटे, जगन्नाथ रेवे, धनंजय पवार, चंद्रकांत पडवळे, तानाजी डोके, विलास राठोड, भास्कर घायाळ, लक्ष्मण जाधव, आयुब शेख, दत्ता कोळेकर, गणेश पाटील, परमेश्वर येणपे, मोहन पवार, संभाजी फाळके, रघुनाथ उन्हाळे, रमेश पवार, संपत आठकळे, वसंत लेढ्वे, बबन रोंगे, दामोदर रेवे, मिन्हाज शेख, अजय सरवळे, श्रीकांत रोंगे, रणजीत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासो कदम यांनी तर आभार राजेंद्र पोतदार यांनी मानले.
दामाजी कारखान्यावर साखर शिल्लक नव्हती मग वाटप कसे सुरू?
कारखान्यावर सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन चेअरमन समाधान आवताडे यांनी दिवाळी साठी सभासदांना साखरही शिल्लक ठेवली नाही म्हणून आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला मग सध्या वाटप सुरू केलेली दामाजी कारखान्याचे शिक्के असलेली साखरेची पोती कोठून आली?
दहा हजार क्विंटल शिल्लक ठेवलेली साखर गुपचूप 32 रुपये किलोने विकण्याचा सत्ताधारी संचालक मंडळाचा डाव होता तो डाव काही शेतकऱ्यांनी स्वतः गोडावूनची पाहणी करून हाणून पाडला साखर शिल्लक असतानाही वाटप नाही याची चर्चा तालुकभर सुरू झाल्याने चौकाचौकात सभासद हे संचालक मंडळ व चेअरमन यांना जाब विचारू लागल्याने नाइलाजास्तव यांना साखर बाहेर काढावी लागली त्यामुळे यांचे पितळ उघडे पडले केवळ थापा मारून सत्तेवर आलेल्या दामाजीच्या सत्ताधारी मंडळाचा कारभार 31 मार्चला आर्थिक निकषातून समजेल
अशोक केदार,संचालक दामाजी शुगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.