
प्रभूलिंग वारशेट्टी
Solapur: देतसे वारी सुख परोपरी, भक्तकाज पुरवितो सावळा श्रीहरि... या अभंगाच्या ओळीप्रमाणे ५६ वर्षांची परंपरा असलेल्या शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या वारीत ७५० कि.मी. अंतर पार करत आलेल्या ७०० वारकऱ्यांना ३३ मुक्कामाच्या ठिकाणी भक्तच वारकऱ्यांच्या भोजनाची सोय करून महाराजांच्या चरणी सेवा वाहतात.