
वैराग : ‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’, ‘आदिशक्ती मुक्ताबाई की जय’ अशा गजरात शेकडो वारकऱ्यांचा बार्शी-परांडा रस्त्यावरील वारदवाडी फाट्यावर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला. यावेळी वरुणराजाने बरसून पालखीचे स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, आदर्श हायस्कूलच्या मुलींनी काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांनी संत आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचे स्वागत जिल्हा प्रशासनासह शेंद्री ग्रामस्थांनी उत्साहात केले.