
सोलापूर : अरण (ता. माढा) येथील श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर तीर्थक्षेत्र विकासाच्या १५० कोटींच्या आराखड्याला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या आराखड्यातून श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा ब्राँझ पुतळा, संतसृष्टी संग्रहालय साकारले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणारा महत्त्वाचा निर्णय झाला आहे.