
वैराग : बंद अवस्थेत असलेल्या वैरागच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी (ता. ६) भीषण आग लागली. या आगीमुळे कारखान्यातील उरलेसुरले भंगारही जळून खाक झाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे निश्चित कारण समोर आले नसले तरी, वाढत्या चोऱ्या दाबण्यासाठीच आग लावली असावी, अशी चर्चा वैराग भागात सुरू आहे.