
सोलापूर: मराठा समाजसेवा मंडळावर प्रशासक नेमण्याचे पत्र आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले आहे. यामागे मराठा समाजाची संस्था संपवण्याचा त्यांचा डाव आहे. या संस्थेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही. चौकशी न करताच प्रशासक नेमणे एकतर्फी व चुकीचे आहे. राजकीय सुडापोटी माझ्याशी त्यांनी स्पर्धा करावी. परंतु स्वत:ची संपत चाललेली शिक्षण संस्था जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी प्रशालेचा बळी देऊ नये, असा आरोप मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत केला.